आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक नवी दिल्ली इथं आज झाली. या बैठकीत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्याविषयी चर्चा झाली. शेतकरी सक्षमीकरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उपयुक्त आहे. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शाश्वत आरोग्य प्रणाली निर्माण करण्यासाठी आयुष प्रणालींना राष्ट्रीय आरोग्य सेवा आराखड्यात समाविष्ट करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत सांगितलं. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ गेल्या २५ वर्षांपासून देशभरात औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी योजना राबवत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Site Admin | December 16, 2025 3:00 PM | Ministry of Ayush
आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक