संरक्षण मंत्रालयानं काल भारत फोर्ज आणि टाटा एडवान्सड सिस्टिम्स या दोन कंपन्यांशी अत्याधुनिक तोफा आणि त्यांना वाहून नेणाऱ्या खास वाहनांच्या खरेदीचा करार केला.
नवी दिल्लीत केलेल्या या कराराचं मूल्य 6 हजार 900 कोटी रुपये आहे.याबरोबरच संरक्षण मंत्रालयाने वर्तमान आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक खरेदीचा टप्पा गाठला आहे.