डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारने देशभरातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागरी क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. भूसंसाधन विभागाने आतापर्यंत जमिनीच्या मालकी हक्काचे निदर्शक असलले १४ कोटी भू आधार क्रमांक वितरित केले असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरी भागातही जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. सुरुवातीला १३० शहरांमधे हा प्रयोग राबवला जाणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.