स्वदेशी ही भारताची खरी शक्ती असून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करावा लागेल, असं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
एक्स या समाज माध्यमावर स्वदेशी अपनाओ’ मोहिमेबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वदेशी हे फक्त एक कापड किंवा वस्तू नसून तो देशातल्या शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आदर, कारागिरांच्या कौशल्याची ओळख आणि आपल्या उद्योगांचा आदर आहे, असं त्यांनी म्हटलं.