परभणीत संविधानाचा अवमान केला गेला – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी  चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 

 

यावेळी आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर वाकोडे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

संविधान हा देशाचा आत्मा असून परभणीत संविधानाचा अवमान केला गेला,अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केला.