महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी नगर इथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निंगचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून वैद्यकीय महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालय, वसतिगृह आदी उपक्रम, तसंच महाविद्यालयांच्या जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्यासाठी हा निधी दोन टप्प्यात द्यावा, असं ते म्हणाले.