अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौ इथं अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केलं. राजनाथ सिंह यांनी संध्याकाळी अटल गीत गंगा या काव्यवाचन कार्यक्रमातही हजेरी लावली. उद्या  ते  लखनौमध्ये  होणाऱ्या सुशासन दिवस कार्यक्रमातही  सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.