डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संरक्षण क्षेत्रातल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी वाढल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या कामगिरीनंतर संरक्षण क्षेत्रातल्या भारतात तयार झालेल्या उत्पादनांसाठी जगात मागणी वाढल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या  नवी दिल्ली इथं आयोजित परिषदेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. भारताच्या सरंक्षण उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाल्याचंही सिंग यावेळी म्हणाले. 

 

यापूर्वी परदेशातून आयात होणारी बहुतेक संरक्षण उपकरणं आता देशातच तयारी केली जातात, असं सांगून ते म्हणाले की देशाच्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद  संरक्षण मंत्रालयासाठी होत असते. अलिकडे सरकारने संशोधन, विकास आणि नवोपक्रम या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.