डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्राच्या मनन शर्मा या NCC छात्राला रक्षा मंत्री पदक

देशातला युवा ही देशाची संपत्ती असून ते राष्ट्र उभारणी आणि समृद्धीमध्ये योगदान देतील, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 ला संबोधित करताना बोलत होते.  सर्व छात्रांनी एकता आणि राष्ट्रीय अखंडतेला आपल्या जीवनात प्राधान्य द्यावं, असं आवाहनही सिंग यांनी केलं. यावेळी छात्र सनेतल्या विद्यार्थ्यांनी संरक्षण मंत्र्यांना मानवंदना दिली. काही छात्रांनी केलेल्या अद्वीतीय कामगिरीमुळे त्यांना रक्षामंत्री पदकांनी गौरवण्यात आलं, त्यात महाराष्ट्राच्या मनन शर्मा या छात्राचा समावेश आहे.