डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मत्स्य उत्पादनात मूल्यवर्धन करणं आणि पायाभूत सुविधा बळकट करणं गरजेचं – मंत्री राजीव रंजन सिंह

देशाची मत्स्योत्पादन निर्यात दुप्पट करायचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी मत्स्य उत्पादनात मूल्यवर्धन करणं आणि पायाभूत सुविधा बळकट करणं अतिशय गरजेचं असल्याचं मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज मांडलं. सध्या ही निर्यात ६० हजार ५२४ कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेनं अतिरीक्त आयात शुल्क लादल्यानं आणखी अनेक देशांमध्ये भारताला निर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे, असं ते म्हणाले. ते आज मुंबईत किनारपट्टीवरच्या राज्यांच्या परिषदेत बोलत होते. 

 

मत्स्योत्पादनात पहिला क्रमांक मिळवण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे, असं आवाहन त्यांनी केलं. मच्छिमारांना घर देण्यासाठी केंद्र सरकारनं चांगली योजना सुरू करावी, अशी मागणी राज्याचे मस्त्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.