डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वित्त आणि नियोजन विभागाने केलेल्या सूचना विचारात घेऊन हे प्रस्ताव तयार करावे असंही सांगितलं. पूरनियंत्रणाबरोबरच धरणांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.