शाळा- महाविद्यालयांतल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळांत दिले जात आहेत. १६ ते ३० जून या कालावधीत सुमारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी पास घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. याआधी सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या मोफत एसटी पासचा लाभ आतापर्यंत ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनीं घेतला आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन पास दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी एसटीनं शाळेत जात असतात. त्यामुळे या भागांतील एसटीच्या फेऱ्या कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नका अशा सूचना प्रत्येक आगार प्रमुखांना दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
Site Admin | July 4, 2025 3:50 PM | Minister Pratap Sarnaik
शाळा-महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळांत वितरित
