वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल कतारचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा झाली. या भेटीत गोयल यांनी कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला. तसंच, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं आणि मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही नेत्यांनी कतार चेंबर आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सह-अध्यक्षतेखाली असलेल्या संयुक्त व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन बैठकीलाही संबोधित केलं.
Site Admin | October 8, 2025 1:42 PM | Minister Piyush Goyal
मंत्री पियूष गोयल यांच्या कतार दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा
