डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 17, 2025 8:03 PM | Minister Piyush Goyal

printer

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती – मंत्री पियुष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभर ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबण्यात येत असून येत्या २ ऑक्टोबर पर्यंत चालणार्‍या या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरं, वृक्षारोपण आणि प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.