भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्यासंदर्भात मंत्री गोयल यांची उद्योजकांशी चर्चा

भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल  यांनी आज मुंबईत काही प्रमुख उद्योजकांशी चर्चा केली. जागतिक स्पर्धा, स्थैर्य, नवोन्मेष आणि मूल्य साखळीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. भारताला वस्त्रोद्योग क्षेत्रातलं सत्ताकेंद्र म्हणून उदयाला आणण्याच्या दिशेनं सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.