डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशाला निरोगी नागरिकांची साथ मिळणं आवश्यक – पियुष गोयल

भारताचं पुढील २५ वर्षांत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशाला निरोगी नागरिकांची साथ मिळणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री  यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. जागतिक आरोग्य परिषदेत गोयल बोलत होते. आपल्या सरकारचा प्रत्येक उपक्रम आणि योजना अंतिमत: नागरिकांचं आरोग्य आणि सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट ठेवून राबवली जात असल्याचं गोयल यांनी सांगितलं.

 

परवडणारी घरं, पेयजलाची आणि स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा, शौचालयांची उपलब्धता आणि शिक्षण या सर्व गोष्टींमुळे असंख्य भारतीयांचं जीवनमान सुधारलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारची विचारसरणी मानवतावाद आणि मानवाच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे, असं गोयल म्हणाले. जगातल्या कोणत्याही देशात गेल्या काही वर्षांत आलेल्या कोणत्याही आरोग्यविषयक समस्येकडे भारतानं प्रथम मदतीचा हात पुढे केला आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेखही गोयल यांनी यावेळी केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.