भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार कराराच्या चर्चेसाठी मंत्री पियुष गोयल अमेरिका दौऱ्यावर

भारत आणि अमेरिकादरम्यान प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून वॉशिंग्टन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते अमेरिकन व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकन वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान, भारत आणि अमेरिकेने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत करण्याची आणि चालू वर्षासाठी परस्पर हिताचे, विविध क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी चर्चा झाली होती.