February 28, 2025 1:37 PM | Minister Piyush Goyal

printer

मंत्री पियुष गोयल आणि युरोपीय व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाचे आयुक्त मारोस सेफकोविच यांच्यात चर्चा

केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज युरोपीय व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाचे आयुक्त मारोस सेफकोविच यांच्याशी आज चर्चा केली. भारत आणि युरोपिय संघ यांच्यात मुक्त व्यापार करार तसंच व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या प्रगतीविषयी यावेळी चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. आगामी काळात युरोपियन संघ आणि भारत एकमेकांसोबत व्यापार आणि गुंतवणूकीत सहकार्य वाढवण्यासाठी काम करेल अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली.