February 20, 2025 8:27 PM | Minister Piyush Goyal

printer

शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक – मंत्री पीयूष गोयल

जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक बनल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते आज पुण्यात परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या एशिया इकोनॉमिक डायलॉग या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या तीन दिवसांच्या परिषदेत ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया, जपान, नेपाळ, नेदरलँड्स, सिंगापुर, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांतले धोरणकर्ते, शिक्षणतज्ञ आणि उद्योग तज्ञ सहभागी झाले आहेत.