उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू-पियुष गोयल

‘उत्तर मुंबई’ला ‘उत्तम मुंबई’ करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू असल्याची ग्वाही पियुष गोयल यांनी आज दिली. उत्तर मुंबईतल्या नागरी सेवांबाबत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर मुंबई आणि संबंधित भागातल्या एकंदर ६० हजार कोटी रुपये मूल्यांच्या नागरी सुविधांवर बैठकीत चर्चा झाल्याचं आणि विविध कामं पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा ठरवल्याचं गोयल यांनी सांगितलं.