बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग आहे असं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा योजनेच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांबू लागवड उपक्रमाच्या आढावा बैठकीत बोलत होते. बांबू लागवडीतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण होईल असं ते म्हणाले. बांबू मातीची धूप रोखतो, भूजलस्तर टिकवतो आणि कार्बन शोषणाद्वारे हवामानातील बदल कमी करण्यास मदत करतो असंही पटेल यांनी सांगितलं.
Site Admin | October 11, 2025 6:55 PM | Pasha Patel
बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग-पाशा पटेल
