August 28, 2024 9:57 AM

printer

राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी नवी दिल्लीत चिलीचे कृषीमंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला यांची भेट घेतली

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत चिलीचे कृषी मंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. दोन्ही देशांमधील कृषी सहकार्य, फलोत्पादन कृती आराखडा यासह सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी आणि परस्पर सहकार्याच्या महत्त्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.याशिवाय भारत आणि चिली या दोन्ही देशांमधील कृषी आव्हाने तसंच कृषी व्यापाराला चालना देण्यासाठीच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.दोन्ही देशांमधील कृषीविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असंही रामनाथ ठाकूर यांनी सांगितलं.