राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी, संबंधित विभाग आणि शिक्षणसंस्थांच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाला दिली. आमदार सुधाकर अडबाले यांनी हा या बाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं. राज्य सरकारच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार ठरवलेल्या,शाळांच्या संच मान्यतेच्या निकषात सुधारणा केली जाणार आहे, तसंच शालार्थ ओळखपत्र तातडीनं देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे, असंही त्यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. शासन निर्णयासंबंधी विरोधी पक्षाच्या सूचना विचारात घेण्याकरता एका बैठकीचं आयोजन करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. आमदार अभिजीत वंजारी यांनी याबद्दलचा प्रश्र उपस्थित केला होता.
Site Admin | July 4, 2025 4:52 PM | pankaj bhoyar
राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सरकारचे आदेश
