August 6, 2024 3:03 PM | Rajya Sabha

printer

‘देशात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आली’

सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णूता धोरण अमलात आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.