डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल, असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन

अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल, असं माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सध्यातरी यामागे दहशतवादी कट असल्याचं आढळून आलेलं नाही. अहमदाबाद इथं १२ जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन २७४ जणांचा मृत्यू झाला. या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून तो विमान अपघात अन्वेषण संस्थेच्या ताब्यात आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा