डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरकारनं भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं – मंत्री नितीन गडकरी

सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

 

भारत आता पारंपारिक ऊर्जेच्या पर्यायाना सातत्यानं प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन असून सरकार आणि अनेक वाहन निर्माण कंपन्या त्या दिशेनं प्रयत्न करत असून देशाच्या आर्थिक विकासात वाहन निर्मिती क्षेत्राचं मोठं योगदान आहे.