यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.
हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे. येत्या १ ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचं वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री उपस्थित राहणार असल्याचं रोहित टिळक यांनी सांगितलं.