डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अन्नदाता शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज – मंत्री नितीन गडकरी

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्यावतीनं पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राज संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित होते. जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास व्यक्त करुन गडकरी म्हणाले.