वाहतूक क्षेत्रामुळे देशातल्या प्रदुषणात चाळीस टक्के भर पडते. त्यामुळे या क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. फरिदाबाद नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉरिडॉरवर एक पेड माँ के नाम या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज झाली त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. भारताचा वाहनउद्योग जपानला मागे टाकून जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. वाहन उद्योगाने जवळपास साडेचार कोटी तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध केली त्याच बरोबर निर्यातीमध्येही महत्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले.
Site Admin | July 8, 2025 3:18 PM | Minister Nitin Gadkari
वाहतूक क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली – मंत्री नितीन गडकरी
