नागरिकांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि असमानतेपासून स्वतःला मुक्त ठेवावं – मंत्री नितीन गडकरी

प्रगतीशील समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि असमानतेपासून स्वतःला मुक्त ठेवलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्लीत लोकमाता अहिल्याबाई होळकर सन्मान संमारंभाला संबोधित करताना गडकरी बोलत होते. कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानलं जाणार नाही अशा समानतेवर आधारित समाजनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी समाजाच्या कल्याणासाठी सरकार राबवत असलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला.