डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची – मंत्री नितीन गडकरी

संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा होत आहे. या निमित्त नागपूरच्या वायुुसेनानगर इथं मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव केला. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं आवश्यक असून विश्वशांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कारगिलच्या सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी उणे ४ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात आणि  कठीण परिस्थितीत सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात हे आपण अनुभवलं असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कल्याणकारी योजना मदतकक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.