दिल्लीत प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं मंत्री नितीन गडकरींची प्रकल्पाची घोषणा

राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं यादृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली. सुमारे साडे बारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून – द्वारका एक्सप्रेसवे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील. यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज उरणार नाही.