सागरी सुरक्षेला राज्य सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून गस्ती नौका या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले. मुंबईमधे भाऊचा धक्का इथं गस्ती नौकेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हायस्पीड गस्ती नौका तैनात करण्यात येत आहेत. अशा १५ नौका तैनात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच नौका तैनात करण्यात आल्या आहेत. या नौकांमुळे अवैध मासेमारी रोखण्यासह किनारपट्टीवरील सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. तसंच या नौकांमुळे मच्छिामारांचीही सुरक्षा होणार आहे, असं राणे म्हणाले.
Site Admin | June 17, 2025 3:28 PM | Minister Nitesh Rane
मंत्री नितेश राणे यांनी केली गस्ती नौकेची पाहणी
