जागतिक आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित देशांच्या हाती राहिलेलं नाही, असं त्या म्हणाल्या. नवीन जग व्यापार आणि तंत्रज्ञानातून आकाराला येत असून भारताला त्यादृष्टीने धोरणं आखावी लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. येत्या काळात वाढत्या मध्यमवर्गाच्या तसंच गरीबांच्या आणि उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं.