केंद्रीय कामगार, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान देणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे. देशाचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकाशवाणीकडून वार्षिक सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं.
Site Admin | October 29, 2025 1:35 PM | Minister Mansukh Mandviya
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान देणार