‘आयटीआय’ मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. त्याअंतर्गत ठाण्याच्या राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपत्ती व्यवस्थापन विषयीच्या शिबिराचं उद्घाटन लोढा यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
Site Admin | May 8, 2025 7:33 PM | ITI | Minister Mangalprabhat Lodha
ITI मध्ये नव्या अभ्यासक्रमाची घोषणा…
