संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाम मधल्या हो ची मिन्ह शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं. भगवान बुद्धांची कालातीत शिकवण वर्तमानातली अनेक जागतिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय सुचवणारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
त्यानंतर, रिजिजू यांनी व्हिएतनामचे राष्ट्रपती लुओंग कुओंग यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशातली व्यापक धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला.