November 10, 2024 6:11 PM | Kiren Rijiju | Nashik

printer

भाजपा संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला जनता बळी पडणार नाही – मंत्री किरेन रिजीजू

भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस करत असून, आता जनता त्याला बळी पडणार नाही, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. 

 

२०१४ पासून देशाचा जो विकास झाला तितका विकास यापूर्वी कधीही झाल्याचं दिसलं नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा झपाट्यानं विकास करण्याचं श्रेय २०१४ नंतर आलेल्या महायुती सरकारला द्यावं लागेल, असं ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, आणि इतर नेते उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.