देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं आवाहन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक मुद्दा राजकीय भिंगातून बघितला जाऊ नये, असं ते म्हणाले. जॉर्ज सोरोस फाऊंडेशन आणि एका ज्येष्ठ  विरोधी नेत्याचे संबंध असल्याचं सार्वजनिक माध्यमातल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी केला.