डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे’

भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजु यांनी केलं. मुंबईत समता परिषदेने भिक्खु संघासाठी आयोजित केलेल्या भोजनदान, चिवरदान कार्यक्रमात रिजिजु सहभागी झाले होते, त्यांनी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्लक्षित झालेल्या स्थळांचा विकास केला जाईल, असं रिजिजु म्हणाले. या कार्यक्रमाला ऑल इंडिया भिक्खु संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी, भाजपचे संघटन मंत्री व्ही. सतीश, अशोक कांबळे उपस्थित होते.