केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संचालन गटाची बैठक

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य संचालन गटाची नववी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि त्यांचं अधिक सक्षमीकरण करण्यावर भर दिला.