सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या विकासाचा कणा असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा हाट २०२६ च्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
या व्यासपीठावर राष्ट्रीय खरेदीदार, आंतरराष्ट्रीय खरेदीदार, भागधारकांसमोर कारागिरांना त्यांच्या हस्तनिर्मित उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करता येते.