भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या दोन आठवड्यातील पश्चिम आशिया भागातल्या भुराजकीय परिस्थितीकडे भारत सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या कच्च्या तेल आयाती संदर्भातील पुरवठा साखळीत विविधता आणली आहे आणि आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. तसंच भारतीय तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवडे पुरेल एवढा तेल साठा उपलब्ध आहे. भारतीय नागरिकांना इंधनाचा पुरवठा स्थिर राहावा यासाठी सरकार सर्व आवश्यक पावलं उचलत आहे, अशी माहिती त्यांनी या संदेशात दिली आहे.
Site Admin | June 23, 2025 1:01 PM | Minister Hardeep Singh Puri
भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचा हरदिपसिंग पुरी यांचा विश्वास
