डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज-हरदीप सिंग पुरी

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज आहे. या करांचे परिणाम दिसू लागल्याशिवाय घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये असं मत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं आहे. अशाप्रकारच्या करांचे विविध उद्देश आणि विविध परिणाम असतात. त्यामुळं नीट समजून घेऊन, काळजीपूर्वक याकडे पाहण्याची गरज आहे आणि वाणिज्य मंत्रालय परिस्थितीचा योग्य आढावा घेत आहेष असं ते म्हणाले. विरोधकांनीही नीट समजून घेऊन या विषयावर बोलावं, असा सल्ला त्यांनी दिला.