राज्यात होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. आघाडी राज्यातल्या दोन तृतीयांश म्हणजेच दोनशे पेक्षा अधिक नागरपालिकांवर विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार यांद्यामधला घोळ म्हणजे विरोधकांचा खोटं नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | November 4, 2025 7:49 PM | Election | Girish Mahajan | Maharashtra | Nagarpalika Nagar Panchayat
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज-गिरीश महाजन