CSIR विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावतं-डॉ. जितेंद्र सिंह

नवोन्मेषी संशोधन, औद्योगिक आणि सामाजिक भागीदारी, क्षमता निर्माण, धोरण निर्मिती करून CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. लखनौ इथं CSIR च्या हिरक महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनात ते आज बोलत होते. या संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय गौरवशाली आहे, असे गौरवोद्गार जितेंद्र सिंह यांनी यावेळी काढले. तसंच  संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.