नीट परिक्षेसंबंधीत चौकशी करण्याची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी या समितीकडून शिफारसी अपेक्षित असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.