सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना बंद होणार नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला, त्याची तपासणी सुरू आहे. योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही बाबी प्रलंबित होत्या, त्याचं उत्तर सरकारनं दिलं असून, लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल आणि राज्य सरकार तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेईल, अशी आशाही बावनकुळे यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.