डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सोलापूरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी करत सोलापूर शहरात बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्रकाश शेंडगे हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी असून या प्रश्नासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली आहे, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलकांनी टोकाची भूमिका न घेता सनदशीर मार्गानं आंदोलन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.