महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण, आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या हब बाबत आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोज्त बैठकीत ते बोलत होते. हा हब ऑस्ट्रेलिया-इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून परदेशातले अभ्यासक्रम आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण, तसंच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होईल, असं पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | September 30, 2025 6:59 PM | Minister Chandrakant Patil
महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल-चंद्रकांत पाटील